Special Report | शिंदे गटाचे शिरसाट…नाराजीवरचे दावे अफाट

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला उदय सामंत उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणतात आणि गुलाबराव पाटील ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख म्हणून करतात.शिंदेंच्या सत्तास्थापनेनंतर केसरकर म्हणतात की ठाकरे आजही आमचे कुटुंबप्रमुख आहेत, मात्र इकडे संजय शिरसाट तीच गोष्ट चुकून ट्विट झाल्याचंही सांगतात.

Special Report | शिंदे गटाचे शिरसाट...नाराजीवरचे दावे अफाट
| Updated on: Aug 13, 2022 | 11:45 PM

मुंबई : औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटातले आमदार संजय शिरसाठ(Sanjay Shirsat ) स्पष्टोक्ते असल्याचा दावा करतायत. मात्र मागच्या काही दिवसात शिरसाटांची विधानं या स्पष्टोक्तेपणाच्या दाव्याशी विसंगत आहेत. म्हणजे गोंधळात टाकणारी विधानं करण्यात शिंदे गटातून संतोष बांगर, संदीपान भुमरेंनंतर आता संजय शिरसाठांचा नंबर लागलाय. शिंदे गटातून संजय शिरसाटांना मंत्रीपद मिळणार की नाही, यावरुन संभ्रमावस्था आहे. त्यावरुन शिरसाट शिंदे गटात नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यात काल रात्री संजय शिरसाटांनी आपल्या ट्विटरवरुन उद्धव
ठाकरेंचा एक व्हिडीओ ट्विट केला आणि वरती लिहिलं की ”महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे’. यावरुन शिंदे गटात खळबळ माजली. मंत्रीपदाच्या नाराजीवरुन शिरसाठ दुसरा मार्ग तर अवलंबणार नाहीत ना, अश्याही चर्चा रंगल्या. शिरसाठांनी आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंना अचानक कुटुंबप्रमुख का म्हटलं, असं जेव्हा आम्ही त्यांना विचारलं., तेव्हा सकाळच्या ७ च्या दरम्यान त्यांची प्रतिक्रिया वेगळी होती., आणि नंतर जेव्हा दीपक केसरकरांनी शिरसाटांची समजूत काढली., त्यानंतर सकाळी १० च्या दरम्यान ते ट्विट मोबाईलद्वारे चुकून झाल्याचं ते म्हटले.

शिरसाटांनी ट्विट चुकून केल्याचं जरी मान्य केलं, तरी प्रश्न उरतो तो म्हणजे ट्विटरवरच्या डीपी म्हणजे प्रोफाईल फोटोचा. काल रात्री शिंदे गटाच्या शिरसाटांनी उद्धव ठाकरेंसोबतचा त्यांचा फोटो ठेवला होता.ृ आणि जेव्हा शिंदे गटाकडून समजूत काढण्यात आली., तेव्हा पुन्हा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो हटवून शिरसाटांनी एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो प्रोफाईलला ठेवला. एकवेळ जुनं किंवा ड्राफ्टमधलं ट्विट पुन्हा रिट्विट होऊ शकतं, मात्र प्रोफाईल फोटो चुकून बदलून पुन्हा दुरुस्त कसा
होऊ शकतो, हे कोडं आहे.

27 जुलैला संजय शिरसाठ मंत्रीपदाची अपेक्षा नाही., जो निर्णय शिंदे घेतील तो मान्य असल्याचं म्हटले आणि आज शिंदेकडे नाराजी व्यक्त केल्याचंही शिरसाटांनीच सांगितलं. 12 ऑगस्टला शिरसाट म्हटले की त्यांना शिंदेंनी मंत्रीपदाचा शब्द दिलाय., आज त्याच शिरसाटांनी सांगितलं की शब्द नव्हे फक्त आश्वासन दिलंय.

 

 

Follow us
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.