मातोश्रीवरील धमकीचा फोन संजय राऊतांच्या माणसाचा…शिवसेनेच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
'मातोश्रीच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारची ती जबाबदारी आहे. मातोश्री आमच्यासाठीही महत्त्वाची पण धमकीचा फोन संजय राऊतांच्या माणसाचा नसावा म्हणजे मिळवलं. राऊतांचीच माणसं मुद्दाम असे कॉल करतात', महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आलेल्या अज्ञातांच्या फोनवर शिवसेना नेत्याचं भाष्य
मुंबई, १५ जानेवारी २०२४ : मातोश्रीच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारची ती जबाबदारी आहे. मातोश्री आमच्यासाठीही महत्त्वाची पण धमकीचा फोन संजय राऊतांच्या माणसाचा नसावा म्हणजे मिळवलं. राऊतांचीच माणसं मुद्दाम असे कॉल करतात, असं खोचक वक्तव्य शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केलं. तर संजय राऊतांना लवकरात लवकर वेड्यांच्या इस्पितळात दाखल करायला हवं. मी उद्धव ठाकरेंना सांगेन की अशा वेड्या लोकांना जवळपास ठेवू नका नाहीतर अजून वाट लागेल, असा खोचक टोलाही संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. पुढे ते असेही म्हणाले, ज्या राम मंदिरावरून आता नाव ठेवताय तोच राम तुन्हाला राम राम म्हणायला लावणार आहे. राम मंदीरावर एवढ बोलताय तर त्यावेळी निधी का दिला ? कशाला पाहणी करायला गेले होते याचाही उत्तर द्यावं? असा थेट सवालही त्यांनी यावेळी केलाय.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

