Sanjay Shirsat Video : खलनायक, बिनडोक, राजकारणातील शकुनी… संजय शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?
संजय शिरसाट यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरुन संजय राऊतांनी टीका केली आहे. त्यावर सवाल केला असता त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.
“संजय राऊत यांच्यावर उद्धव ठाकरे नाराज आहेत. तर बोललं पाहिजे. उद्धव ठाकरे का बोलत नाहीत हे आश्चर्य वाटतंय. उद्धव ठाकरे यांचं काहीतरी गुपित संजय राऊतांकडे आहे, अशी मला शंका असते. नाही तर संजय राऊतांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं नसतं. शिवसेना प्रमुख हयात असताना ही विधाने केली असती तर आतापर्यंत कुठे लाथ मारली असती आणि कुठे फेकलं असतं हे कळलं नसतं. मराठी महिला म्हणून प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे होते.”, असे संजय शिरसाट म्हणाले. तर यांना राजकारणाचा गंध नाही. दलाली करून ‘समाना’वर पोट भरताय, त्यांना राजकारणात कसं वागावं हे समजत नाही. बाळासाहेबांच्या सानिध्यात राहून हे बिनडोक पैदा होतील हे महाराष्ट्राला आश्चर्यजनक आहे, असं वक्तव्य करत नाव न घेत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.
पुढे शिरसाट असेही म्हणाले, उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांना गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. यांच्या विरोधात कार्यक्रम केला तर त्यांना गद्दार शब्द चिटकवण्याची त्यांच्याकडे स्पर्धा लागली आहे. चांगल्या माणसाने चांगलं काम केलेलं त्यांना आवडत नाही. आशा भोसले जेव्हा शिंदेंचं कौतुक करतात तेव्हा आपला शिवसैनिक कोणत्या स्तरावर गेला याचं त्यांना कौतुक नाही. जे त्यांना सोडून जातील ते सर्व यांच्या नजरेत गद्दार आहेत. मग शरद पवारांवरही गद्दारीचा शिक्का लागला की काय असा प्रश्न पडतोय? तर कोण आहे संजय राऊत. काय अस्तित्व आहे. कधी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा लढलीय का. त्यांना काय माहीत आहे. भाषण करणं वेगळं आणि तळागाळात जाऊन काम करणं वेगळं. ते फक्त पोपटपंची करतात”, असे म्हणत संजय शिरसाटांनी हल्लाबोल केलाय.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
