आम्ही शिवसेना भवन ताब्यात घेतलं असतं पण…, राऊतांच्या ‘त्या’ टीकेवरून संजय शिरसाट याचं प्रत्युत्तर
मुब्र्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शाखा होती. त्यावर बुल्डोजर फिरवण्यात आलाय. यानंतर ही शाखा शिवसैनिकांकडून ताब्यात घेण्यात आली आहे. याचा विरोध ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे
मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३ | मुब्र्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शाखा होती. त्यावर बुल्डोजर फिरवण्यात आलाय. यानंतर ही शाखा शिवसैनिकांकडून ताब्यात घेण्यात आली आहे. याचा विरोध ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. शिरसाट म्हणाले, मुब्र्याची शाखा ही अनधिकृत होती, त्यामुळे त्यावर बुल्डोजर फिरवला, संजय राऊत यांच्याकडे अर्धवट माहिती आहे. शासन अनधिकृत शाखांवर कारवाई करतेच, संजय राऊत यांनी बोंबलत राहावं. पुढे ते असेही म्हणाले की, आम्हाला जर शाखा ताब्यात घ्यायच्या असत्या तर आम्ही बाळासाहेब भवन ताब्यात घेतलं असतं. संपत्तीत आम्हाला इंटरेस्ट नसल्याचे म्हटलंय. आम्ही घटनाबाह्य आहोत की नाही हे ठरवणारे संजय राऊत कोण? आमच्याबाबत सुप्रीम कोर्ट काय तो निर्णय देईल. प्रत्येकाला इशारा देतात पण काय झालं काही होत नाही, असं म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.