इम्तियाज जलील चिल्लर! संजय शिरसाट यांची खवचट टोला
मंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर चिल्लर माणूस म्हणत जोरदार टीका केली. जलील यांना लवकरच शहर सोडून जावे लागेल, असे ते म्हणाले. व्हायरल झालेल्या मतदार यादीच्या गैरप्रकाराची सायबर सेलने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यातील वातावरण, विकास निधी वाटप आणि विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी उत्तरे दिली.
मंत्री संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. इम्तियाज जलील यांच्यावर त्यांनी तीव्र शब्दांत हल्ला चढवला. जलील यांना चिल्लर माणूस म्हणत, त्यांना लवकरच हे शहर सोडून जावे लागेल, अशी टीका शिरसाट यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्याशी बरोबरी करण्याची जलील यांची पात्रता नाही, असेही ते म्हणाले.
प्रचारसभेत व्हायरल झालेल्या एका मतदार यादीच्या मुद्द्यावरही शिरसाट यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. मतदारांना विकत घेतल्यासारखे दाखवणे किंवा त्यांना भयभीत करणे हा गैरप्रकार असून, सायबर सेलने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली. मतदार भयभीत झाल्यास मतदानाचा हक्क बजावणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेलाही त्यांनी उत्तरे दिली. विकास निधी सर्व आमदारांना मिळतो आणि निवडणुकांमध्ये चिखलफेक टाळण्याची काळजी घेणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
गोल्ड मेडलिस्ट इंजीनिअर ते नाईट क्लबचा फाऊंडर, कोण आहेत लुथरा ब्रदर्स?
इम्तियाज जलील चिल्लर! संजय शिरसाट यांची खवचट टोला
भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा! पाहा व्हिडीओ
20217 नंतर निवडणुका का घेतल्या नाही? किशोरी पेडणेकर यांचा सवाल

