Manoj Jarange Patil : आजपासून 3 महिने मी बोलणार नाही; मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
Sanjay Shirsat- Manoj Jarange Patil : संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अत्यंत तातडीची भेट घेतली आहे. जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील निवासस्थानी ही भेट झाली आहे. या भेटतीत दोघांमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, अचानक झालेल्या या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसून अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मंत्री संजय सिरसाट यांनी या अडचणी दूर कराव्यात. तसेच यावेळी मराठा आरक्षण संदर्भातही चर्चा झाली. आम्ही राज्यातील प्रत्येक आमदार खासदार, मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना अंतरवाली सराटी येथे बोलावणार आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय येणाऱ्या ३० जूनच्या अधिवेशनात मार्गी काढा अशी आमची मागणी असल्याचं देखील जरांगे यांनी यावेळी म्हंटलं.