नागपुरातील वर्धा रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त सध्या विशेष आयोजन करण्यात आले आहे. मंदिर फुलांनी सुशोभित केले असून, सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. या निमित्ताने पूजापाठ आणि मंत्रोच्चार सुरू आहेत.
मंदिराचे ट्रस्टी सचिव राजेंद्र वासुदेवराव साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तारखेपासून सात दिवसांचा सप्ताह सुरू आहे. हे मंदिर सन १९९४ मध्ये स्थापन झाले असून, आज जवळपास ३० ते ३५ वर्षे झाली आहेत. प्रकट दिनाच्या दिवशी दोन ते तीन हजार भक्त येण्याचा अंदाज आहे. सध्या रुद्रपूजा सुरू असून, दुपारी १२ वाजता गजर होईल, त्यानंतर प्रसादाचे वितरण केले जाईल आणि सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. उद्या महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भक्त महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.