Santosh Deshmukh Case : बारामतीत सर्वधर्मीय मोर्चाला सुरुवात, काय म्हणाले धनंजय देशमुख? पाहा Video
Baramati Morcha : बारामती शहरात आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख देखील उपस्थित आहेत.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बारामतीत सर्वधर्मीय मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख देखील सहभागी झालेले आहेत. शहरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. विशेष म्हणजे या मोर्चात युगेंद्र पवार देखील सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, माझ्या आयुष्यातलं सर्वस्व या क्रूरकर्मी लोकांनी संपवलं आहे. एखाद्या गुन्ह्यात 302चा कलम लावलेल्या आरोपीच्या समर्थनार्थ या लोकांनी मोर्चे काढले हे पहिल्यांदा घडलं असेल. या लोकांना सहआरोपी कराव, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावे, पण त्यांना सांगावं की आरोपीचं समर्थन करण्याचा गुन्हा त्यांनी केला आहे. पुढचा तपास हा निपक्षपातीपणे झाला पाहिजे अशीच आमची मागणी आहे. कृष्णा आंधळेचे पोलिसांसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते, त्यामुळे अजून त्याला कशी अटक होत नाही, याचं उत्तर पोलिसांनी द्यावं, असंही धनंजय मुंडे यांनी म्हंटलं आहे.

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
