Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार? मोठी अपडेट आली समोर
Santosh Deshmukh Case First Hearing : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटला केज न्यायालया ऐवजी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात चालवला जावा, अशी विनंती एसआयटीने केलेली होती. त्यावर अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही सुनावणी सध्या तरी केज न्यायालयातच होणार आहे.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी ही 12 मार्च रोजी केज न्यायालयातच होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटला केज न्यायालया ऐवजी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात चालवला जावा, असा विनंती अर्ज एसआयटीने न्यायालयात केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. त्यात पुढील सुनावणी 18 मार्च रोजी होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देशमुख हत्या प्रकरणातील खटला बीडच्या न्यायालयात चालवण्याची विनंती करण्यात आलेली आहे. आरोपींना बीड कारागृहातून केज येथे नेण्यास कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अडचणीने आहे. तसंच साक्षीदार देखील तिथेच आहेत. त्यामुळे ही मागणी एसआयटीने केली होती. त्यावर अद्याप निर्णय देण्यात आलेला नसल्याने तोवर हा खटला केज न्यायालयातच चालणार आहे. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणातील पहिली सुनावणी ही 12 मार्च रोजी केज न्यायालयातच होणार आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
