Santosh Deshmukh Case : बारामतीच्या मोर्चात भावाच्या आठवणीने धनंजय देशमुखांच्या अश्रुचा बांध फुटला
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आज बारामतीत सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चात धनंजय देशमुख यांना आपले अश्रु अनावर झाले. व्यासपीठावर भाऊ संतोष देशमुख यांच्या आठवणीने धनंजय देशमुख यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची 3 महिन्यांपूर्वी अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आलेली होती. त्यानंतर हत्येचा तपास पूर्ण झाल्यावर सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातले मन सुन्न करणारे फोटो आणि व्हिडिओ गेल्या आठवड्यात सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यानंतर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी राज्यात सर्वत्र मोर्चे काढले जात आहेत. आज बारामतीत देखील सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख देखील सहभागी झालेले आहेत. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असताना धनंजय देशमुख यांना अश्रु अनावर झाले. विशेष म्हणजे आज धनंजय देशमुख यांचा वाढदिवस देखील आहे. यावेळी संतोष देशमुख यांच्या आठवणीने ते भावनिक झाले. त्यांना अश्रु अनावर झाल्याचे बघायला मिळाले.