Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'एक चापट खाल्ली अन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?'; देशमुख कुटुंब नामदेव शास्त्रींवर नाराज

‘एक चापट खाल्ली अन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?’; देशमुख कुटुंब नामदेव शास्त्रींवर नाराज

| Updated on: Feb 02, 2025 | 2:16 PM

मीडियाने संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची मानसिकता का समजून घेतली नाही? असं वक्तव्य करणाऱ्या नामदेव शास्त्री सानपांवर सोशल मीडियावर चौफेर टीका झाली.

आज पूर्ण महाराष्ट्राला एकच बाजू माहीत आहे. दुसरी बाजू त्यांना दाखवण्यासाठी आम्ही जात आहोत. न्यायाधीशही दोन बाजू ऐकतो नंतर वक्तव्य करतो. आम्हाला वाटतं त्यांनी आमचीही बाजू ऐकावी आणि नंतर विधानं करावे. आम्ही त्यांना भेटणार आहोत. आमची बाजू आणि घडलेली घटना त्यांना सांगणार असल्याचे संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने म्हटले. परंतु नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला दुःख वाटते. आरोपी खंडणी मागायला आले आणि त्यांनी दलित बांधवाला मारहाण केली म्हणून माझ्या वडिलांनी त्यांना अडवले. परंतु त्यांना वाटते त्यांची मानसिक स्थिती बदलली आणि म्हणून माझ्या वडिलांना हत्त्या केली. एक चापट खाली आणि मारेकऱ्यांची मानसिकता बिघडली. आज आमचे वडील आमच्यात नाही तर आमची मानसिकता काय असेल? असा सवालही वैभवी देशमुख यांनी उपस्थित केलाय. तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराजांनी जे म्हटले आहे की मीडियाने आरोपींची मानसिकता दाखवली नाही, या वक्तव्याचा मला मानसिक त्रास झाला असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले. त्यांनी एकच बाजू सांगितली आहे. त्यांची मानसिकता बघण्यापेक्षा माझ्या भावाचे किती हाल केले त्याला हाल करून मारले त्याला पाणी नाही दिले, हे पाहिले पाहिजे. जे लोक अपहरण करू शकतात ज्यांच्या वरती खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची मानसिकता आणि त्यांना कोणी सांभाळलं ते ज्या लोकांसोबत फिरत होते त्यांना कोणी हे करायला लावलं हे देखील पाहिले पाहिजे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.

Published on: Feb 02, 2025 02:16 PM