Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड निर्दोष मुक्त होणार? पाहा कोर्टात काय घडलं..
Santosh Deshmukh Case Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पार पडलेल्या सुनावणीनंतर वकील उज्वळ निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 22 जुलै 2025 रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत वाल्मिक कराड याच्या दोषमुक्ती अर्जावर आणि त्याच्यासह इतर आरोपींच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर युक्तिवाद झाला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यावेळी उपस्थित राहून न्यायालयाला माहिती दिली की, दोषमुक्ती आणि मालमत्ता जप्तीच्या अर्जांवर 22 जुलै रोजी निर्णय होईल.
वाल्मिक कराड याला बीडमधील तुरुंगातून नाशिकच्या कारागृहात हलवण्याबाबतच्या चर्चांवर निकम यांनी स्पष्ट केले की, ही बाब तुरुंग प्रशासनाच्या अखत्यारीत येते. यासंदर्भात न्यायालयात कोणताही अर्ज दाखल झालेला नाही, आणि न्यायालयानेही याबाबत कोणतीही विचारणा केलेली नाही. सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात आहे.
आरोपींच्या मालमत्ता जप्त न करण्याच्या अर्जांवरही आज चर्चा झाली, आणि याबाबतही 22 जुलै रोजी निकाल जाहीर होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, वाल्मिक कराड याच्या बँक खात्यावरील सील रद्द करण्याच्या मागणीवरही युक्तिवाद झाला, ज्याचा निर्णय 22 जुलै रोजी होणार आहे. निकम यांनी पुढे नमूद केले की, कराड याला कोणत्या तुरुंगात ठेवणे सुरक्षित आहे, याबाबतचा निर्णय तुरुंग प्रशासन घेईल, आणि यासंदर्भात न्यायालयात कोणताही प्रस्ताव सादर झालेला नाही. त्यामुळे आता या सुनावणीचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

