Santosh Deshmukh Murder case  : अवादा कंपनीकडे खंडणीची मागणी, 'तो' खळबळजनक CCTV पाहिला? वाल्मिक कराडसह सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये

Santosh Deshmukh Murder case : अवादा कंपनीकडे खंडणीची मागणी, ‘तो’ खळबळजनक CCTV पाहिला? वाल्मिक कराडसह सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये

| Updated on: Jan 21, 2025 | 3:52 PM

वाल्मिक कराडवर २० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणातील नवीन सीसीटीव्ही समोर आला आहे. व्हायरल होणारं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पाहिलंत?

बीड खंडणी प्रकऱणातील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. अवादा कंपनीकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्या दिवशीचे हे CCTV फुटेज असल्याची माहिती मिळतेय. या व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड यांच्यासह सर्व आरोपी दिसताय तर विशेष म्हणजे काही पोलीस अधिकारीही त्यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेस बालाजी तांदळे यांसह सर्व आरोपी एकत्र असून पीएसआय पाटीलही या व्हिडीओमध्ये दिसताय. बीडच्या खंडणी प्रकरणातील हा नवीन सीसीटीव्ही व्हिडीओ असल्याची माहिती आहे. दरम्यान, अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवसाचा हा व्हिडीओ असल्याचे बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी खंडणी मागण्यात आली त्या दिवशी म्हणजे २९ नोव्हेंबर २०२४ चे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे फुटेज विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील फुटेज आहे. यात वाल्मिक कराड दिसत आहे. त्यासोबतच विष्णू चाटे पाहायला मिळत आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे हे सर्व हत्येतील आरोपी यात पाहायला मिळत आहेत.

Published on: Jan 21, 2025 03:52 PM