Santosh Deshmukh Murder Video : ‘पप्पांच्या मृतदेहासमोरच धिंगाणा…’, देशमुखांच्या लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला, खंडणीवरून थेट संतप्त सवाल
धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरून काढल्यानंतर आता सखोल चौकशी करा आणि सह आरोपी करा अशी मागणी रोहित पवारांनी केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचाही हात असल्याचा आरोप जरांगीनी केला. तर खंडणी नेमकी कोणाकडे जात होती? असा सवाल देशमुखांची मुलगी वैभवीने केलाय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेल्या धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी धसांपासून विरोधकांची आहे. ज्या खंडणीतून संतोष देशमुखांची हत्या झाली ती बैठकच मुंडेंच्या सातपुडा या बंगल्यावर झाल्याचा आरोप धसांनी केलाय. मात्र अशी कोणतीही बैठक झाल्याचं सीआयडीच्या चौकशीत आढळल्याचं दिसलं नाही असं मुख्यमंत्र्यांनी टीव्ही नाईनशी बोलताना म्हटलंय. पण वाल्मिक कराड आणि मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं धस म्हणाले. दोन कोटींच्या खंडणीचे आड आले म्हणून वाल्मिक कराड आणि त्याच्या हैवानांनी सरपंचाची हत्या केली असा आरोप पत्रात सांगण्यात आलाय. मग ही खंडणी नेमकी कोणाकडे जात होती? त्यांच्यापर्यंत पोहोचणार की नाही? असा संतप्त सवाल सरपंचांची मुलगी वैभवीने केलाय.
बापाच्या न्यायासाठी लेकीचे अश्रू अनावर
‘जे फोटो आहेत त्याच्यामध्ये माझ्या वडिलांची इतक्या अमानुष पद्धतीने तुम्ही मारहाण करून देखील जे अमानुष कृत्य तुम्ही त्यांच्यासोबत घडवून आणलं ते त्यांचं मृतदेह देखील तुमच्या समोर असताना देखील तुम्ही हसताय, धिंगाणा घालताय, त्यांच्यासोबत फोटो काढताय. म्हणजे हे आम्हाला याचं किती दुःख आहे त्यांना इतकं दुःख का झालं नाहीये की हे इतकं आणि जे शब्द आहेत की मला माझ्या गावासाठी आणि मुलामुलींसाठी जगू द्या हे ऐकलं ना म्हणजे अश्रू अनावर होतायत आणि मला हा प्रश्न पडलाय की ते एक वडील होते त्यांनी आपल्या मुलांचा विचार केला शेवटी तर त्यांना त्यांची मुलं का आठवली नसतील?’, असं वैभवी देशमुख म्हणाली. पुढे ती असंही म्हणाली, जी हत्या खंडणीमुळे झाली आहे ते लोक इतक्या अमानुषपणे ते कृत्य करताहेत तर याच्यामागे कोणाचा हात आहे. आणि जी खंडणी जाते ती नेमकी कोणा साठी जाते ती कोणाकडे जात आहे, असंही वैभवी म्हणाली.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
