Vaibhavi Deshmukh Video : ‘माझं बरं वाईट झाल्यास आई अन्…’, बीड हत्या प्रकरणात संतोष देशमुखांच्या मुलीचा जबाब
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिचा जबाब समोर आला आला आहे. या जबाबानंतर एकच खळबळ उडाली आहे. विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांच्यात फोनवरून संभाषण झालं असल्याचा उल्लेख वैभवी देशमुख हिने तिच्या जबाबात केला आहे. दरम्यान, एखाद्या लहान गोष्टींसाठी […]
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिचा जबाब समोर आला आला आहे. या जबाबानंतर एकच खळबळ उडाली आहे. विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांच्यात फोनवरून संभाषण झालं असल्याचा उल्लेख वैभवी देशमुख हिने तिच्या जबाबात केला आहे. दरम्यान, एखाद्या लहान गोष्टींसाठी जीवावर का उठता? असं संतोष देशमुख विष्णू चाटेला म्हणाले होते, असं वैभवी देशमुख हिने म्हटलंय. विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांच्यात फोनवरून साधारण दहा ते बारा मिनिटं संभाषण झालं असल्याची माहितीदेखील वैभवी देशमुख हिने दिली. तर फोन झाल्यानंतर तो फोन विष्णू चाटेचाच होता असं संतोष देशमुखांनी सांगितलं होतं. ‘माझं काही बरं वाईट झाल्यास आई आणि विराजची काळजी घे…’, फोन ठेवल्यानंतर संतोष देशमुखांचं वाक्य होतं असं वैभवी देशमुखने म्हटलंय. बघा नेमका वैभवी देशमुखचा जबाब काय?

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
