Satara News : साताऱ्याच्या कृष्णा नदीचं रौद्र रूप, वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात शिरलं पाणी, बघा VIDEO
साताऱ्यात मुसळधार पाऊस होत असल्याने वाईमध्ये असणाऱ्या कृष्णा नदीला पूर आलाय. या पुराचे पाणी वाईमधील प्रसिद्ध महागणपती मंदिरामध्ये शिरल्याचे पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील धोम धरणातून मध्यरात्री पाण्याचा विसर्ग वाढवल्याने वाईमधील कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कृष्णा नदीने रौद्र रूप धारण केल्यामुळे वाईमधील कृष्णा नदी पात्राजवळील प्रसिद्ध असलेल्या महागणपती मंदिरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळतंय. तर महागणपती मंदिराच्या शेजारी असलेल्या दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्याने पूजेच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. महागणपतीच्या मंदिरात गणपतीच्या पायापर्यंत कृष्णा नदीचे पाणी लागलंय. सततच्या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात 8 हजार 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे कृष्णा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?

