Satara Case : त्याच डॉक्टरकडून माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट… छळाला कंटाळून संपवलं जीवन, 2021ला अधिकाऱ्याशी तिचं लग्न पण… पांचगणे कुटुंबाच्या दाव्यानं खळबळ
साताऱ्यातील पांचगणे कुटुंबाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मुलगी दिपालीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सासरच्यांच्या छळाला कंटाळून दिपालीने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. शवविच्छेदन अहवालात फेरफार झाल्याचा आणि राजकीय दबाव असल्याचा त्यांचा संशय आहे.
साताऱ्यातील पांचगणे कुटुंबाने त्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली आहे. त्यांची मुलगी दिपाली हिने 2021 मध्ये अजिंक्य निंबाळकर यांच्याशी विवाह केला होता. विवाहानंतर सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या छळाला कंटाळून दिपालीने आत्महत्या केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कुटुंबाने केलेल्या आरोपानुसार, दिपालीच्या मृत्यूनंतर पाच दिवस शवविच्छेदन अहवाल देण्यात आला नव्हता. फलटणच्या महिला डॉक्टरांनी बनवलेल्या शवविच्छेदन अहवालावर कुटुंबाने संशय व्यक्त केला आहे. अहवाल बनवताना मृत महिला डॉक्टरवर दबाव होता का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी पांचगणे कुटुंबाने केली आहे. त्यांनी शवविच्छेदन अहवालात राजकीय दबावामुळे फेरफार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. अप्पर अधीक्षकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

