AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satej Patil | किरीट सोमय्यांना तक्रार दिल्यानंतर फिरण्याची काय गरज ? सतेज पाटील यांचा सवाल

Satej Patil | किरीट सोमय्यांना तक्रार दिल्यानंतर फिरण्याची काय गरज ? सतेज पाटील यांचा सवाल

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 3:57 PM
Share

मला वाटते किरीट सोमय्या हे सरकार अस्थिर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करत आहेत.   एकदा तक्रार दिल्यानंतर परत तुम्ही  फिरण्याची काय आवश्यकता आहे .याचा अर्थ तुम्ही तीथे पब्लिसिटी स्टंट करत आहात.

किरीट सोमय्यांच्या मागच्या दौऱ्या वेळी कलम 144 लावलं होतं. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये अशी अपेक्षा होती. आमची त्यांना आत्ता देखील विनंती आहे, आपण शांततेत तिथे जावं,  भडक वक्तव्य करून जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये.  मला वाटते किरीट सोमय्या हे सरकार अस्थिर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करत आहेत.   एकदा तक्रार दिल्यानंतर परत तुम्ही  फिरण्याची काय आवश्यकता आहे .याचा अर्थ तुम्ही तीथे पब्लिसिटी स्टंट करत आहात. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणून त्यांची बदनामी करायची एवढेच आहे. सत्य थोडा उशिराने बाहेर पडतं. परंतु, तोपर्यंत कारण नसताना लोकांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचे एक षडयंत्र रचलेलं आहे अस मला वाटतं.  देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी कुठेतरी उघडपणे सांगितले पाहिजे. हे सगळ आम्ही किरीट सोमय्या यांना करायला लावतोय. एकदा त्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रालाही कळेल की सुड बुद्धीचं राजकारण होतय.