हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले याला आता वन विभागाने ताब्यात घेतलं आहे. हरणाच्या शिकारीचा खोक्यावर संशय आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसलेची आता चौकशी होणार आहे. वन्य प्राण्यांचं मांस आढळल्या प्रकरणी वनविभाग त्याची चौकशी करणार आहे. वनविभागाने आता आरोपी सतीश भोसले याचा ताबा घेतला आहे. सतीश भोसले हा सध्या जिल्हा कारागृहात आहे. मारहाण प्रकरणी आणि हरणाची शिकार केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे वन विभागाच्या चौकशीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
Published on: Apr 03, 2025 03:46 PM
Latest Videos
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

