Weather Update | राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा, तापमान 45 अंशावर जाणार?
राज्यभर सध्या उन्हाचा चटका वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून हवामान खात्याने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, विदर्भात तापमान सर्वाधिक नोंदवले जात आहे. अकोला येथे तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून अमरावतीमध्ये 42 अंश नोंदवले गेले आहे.
राज्यभर सध्या उन्हाचा चटका वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून हवामान खात्याने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, विदर्भात तापमान सर्वाधिक नोंदवले जात आहे. अकोला येथे तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून अमरावतीमध्ये 42 अंश नोंदवले गेले आहे. इतर अनेक ठिकाणीही तापमान 40 अंशांपेक्षा अधिक आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. परभणी आणि मालेगाव येथे तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत गेले असून इतर भागातही 38 ते 39 अंशांदरम्यान तापमान नोंदवले जात आहे. दरम्यान, कोकणात तुलनेने कमी तापमान असून ते 35 ते 36 अंश सेल्सिअसदरम्यान आहे.
हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, सध्या तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी जास्त आहे. जरी काही ठिकाणी तापमान 40 अंशांपेक्षा जास्त असले तरी अद्याप ‘हिट वेव्ह’ची स्थिती निर्माण झालेली नाही. मात्र येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, त्यानुसार ‘हिट वेव्ह’चा इशारा दिला जाऊ शकतो. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच
मुस्लीम तरुणाकडून हिंदू नाव वापरुन 29 वर्षीय तरुणीची फसवणूक
भोंदू अशोक खरातचा पाय खोलात, नाशिकमधील घरी आयकर विभागाकडून छापेमारी

