Bhushan Gavai Attack : वकिलानंच सरन्यायाधीशांवर केला हल्ला, जवळ गेला अन् फेकला बूट… नेमकं घडलं काय?
सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वकिलाने त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच रोखले.
सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न वकिलांकडून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वकिलाने जवळ येऊन सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडत असतानाच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्या वकिलाला जागेवरच रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या वकिलाने सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असे म्हणत आपला हेतू स्पष्ट केला. सुरक्षा रक्षकांनी त्वरित कार्यवाही करत संबंधित वकिलाला सुप्रीम कोर्टातून बाहेर काढले. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे कोर्ट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता दाखवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..

