Girish Bapat | भविष्यात सेना-भाजप युती शक्य, सरनाईक सगळ्यांच्या मनातलं बोललेत : गिरीश बापट

ताप सरनाईक हे सगळ्यांच्या मनातलं बोलले आहेत. आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे. भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, असं गिरीश बापट म्हणाले.

भाजप-सेनेची युती ही हिंदुत्वावर होती. ती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. कारण मला असं वाटतंय ही सर्वांच्या मनातील बोलकी प्रतिक्रिया आहे. प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातील बोलले आहेत. भविष्यात युती होऊ शकते.  राजकीय जीवनात अशा गोष्टी घडत असतात. भाजपने याआधीही सांगितलं होतं, तुमची आमची नैसर्गिक युती आहे. पण मधल्या काळात कृत्रिम लोकांनी ती तोडली. पण भविष्यात अशी युती झाली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असं गिरीश बापट म्हणाले. प्रताप सरनाईक हे सगळ्यांच्या मनातलं बोलले आहेत. आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे. भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, असं गिरीश बापट म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI