‘हमाम मे सब नंगे होते है…’ – संजय राऊत

‘हमाम मे सब नंगे होते है…’ – संजय राऊत

| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 11:57 AM

राजकारणाच्या हमाम में सब नंगे है. मग तुम्ही कितीही अत्तर लावा. जितकी आपण जास्त चर्चा करु तितका त्याचा गंध पसरेल, असंही संजय राऊत म्हणाले.

राजकारणात सर्व मोठे लोक अशा प्रकारचं महागडं अत्तर घरात ठेवत असतात. मात्र दुसऱ्यांच्या घरात मिळाल्यावर त्याची चर्चा होते. लखनऊ, कनौज, कानपूरमध्ये 180 कोटींचं पेपर परफ्यूम मिळालं आहे. कलरफूल. आता त्यावर राजकारण होत आहे. गोव्यात काय चाललंय? उत्तर प्रदेशात काय चालणार? पंजाबात काय होणार? याच परफ्यूमचा वापर करून तुम्ही निवडणुका लढणार आहात आणि जिंकणार आहात. राजकारणाच्या हमाम में सब नंगे है. मग तुम्ही कितीही अत्तर लावा. जितकी आपण जास्त चर्चा करु तितका त्याचा गंध पसरेल, असंही संजय राऊत म्हणाले.