Amravati Heat Wave | विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला
राज्यभर उष्णतेची तीव्र लाट कायम असून विदर्भात परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. अमरावतीमध्ये काल तापमानाने 46 अंशांचा टप्पा गाठत गेल्या सात वर्षांचा विक्रम मोडला. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी अमरावतीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्यभर उष्णतेची तीव्र लाट कायम असून विदर्भात परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. अमरावतीमध्ये काल तापमानाने 46 अंशांचा टप्पा गाठत गेल्या सात वर्षांचा विक्रम मोडला. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी अमरावतीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील वर्दळही कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिक घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेत आहेत. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे जलसाठ्यावरही परिणाम होत असून पाण्याची पातळी घटत आहे. त्याचबरोबर तापमानात मोठा उचांक पाहायला मिळत आहे.
याचवेळी अकोल्यामध्येही काल तापमान 46 अंशांवर पोहोचले. त्यामुळे अकोला राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदवणारे शहर ठरले आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Published on: Apr 27, 2026 10:29 AM
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द

