Naned : भीषण पाणी टंचाई अन् दुष्काळ, ‘या’ जिल्ह्यात पाण्यासाठी जीवाचं रान अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना
नांदेडच्या भोकर तालुक्यातील गारगोटवाडीतील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे गावातील लग्नाळू तरुणांची लग्न थांबली आहेत.
राज्यात सगळीकडे सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. तर दुसरीकडे पाणीटंचाईच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. बेरोजगारीमुळे मुलांची लग्न होत नाहीत हे तुम्ही सर्वत्र ऐकलं असेल. मात्र नांदेडच्या गारगोटवाडीमध्ये चक्क पाणीटंचाईमुळे मुलांची लग्न होत नाहीयेत. महिलांना दिवसभर पाण्यासाठी बोअरवेलवर बसावं लागतंय. दुसरं काही काम करता येत नाही. गावात पाणी नाही म्हणून लग्नाळू मुलांना कुणी मुली सुद्धा देत नाही. गावात पाण्यासाठी नळ योजना नाहीयेत त्यामुळे नागरिकही त्रस्त आहेत. तर दुसरीकडे गावातील लग्न होत नाहीत म्हणून तरुणानं खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे पाण्याच्या समस्यासंदर्भात लक्ष देऊन ही समस्या कायमची दूर करण्याची मागणी केलीये. गावातील पाण्याच्या समस्या सरकारने कायमस्वरूपी सोडवल्यास गारगोटवाडीतील लग्नाळू तरुणांचे हात लवकरच पिवळे होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published on: Apr 16, 2025 01:21 PM
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
