AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी दुवा, मग हात जोडून अखेरचं दर्शन, नंतर शाहरुख थुंकला?

आधी दुवा, मग हात जोडून अखेरचं दर्शन, नंतर शाहरुख थुंकला?

| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 12:29 AM
Share

सुपरस्टार शाहरुख खान (King Khan Shahrukh Khan trolled) यानं लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी केलेली कृती चांगलीच गाजतेय. अनेकांनी शाहरुख खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओही टीव्ही 9 मराठीनं समोर आणला आहे.

मुंबई : सुपरस्टार शाहरुख खान (King Khan Shahrukh Khan trolled) यानं लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी केलेली कृती चांगलीच गाजतेय. अनेकांनी शाहरुख खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओही टीव्ही 9 मराठीनं समोर आणला आहे. लता मंगेशकर यांच शुक्रवारी निधन (Lata Mangeshkar is no more) झालं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक दिग्गजांची हजेरी शिवाजी पार्कवर पाहायला मिळाली. यावेळी शाहरुख खान पत्नी गौरीसह लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी आला होता. तेव्हा त्यानं दोन्ही हात फैलावून आधी लता मंगेशकर यांच्यासाठी दुवा मागितली. यानंतर मास्क खाली करुन तो काहीतरी करताना दिसला. मग दोन्ही हात जोडून शाहरुख खाननं लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला प्रदक्षिण घातला. या संपूर्ण प्रकारावरुन सोशल मीडियात एका नवा वाद चर्चिला जातो आहे. शाहरुख खाननं दुवा मागितल्यानंतर मास्क खाली करुन केलेली कृती ही थुंकण्याचा प्रकार होता, असा आरोप अनेकांनी ट्वीट करत केला आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड (New controversy of Shahrukh Khan) फुटलंय.

Published on: Feb 06, 2022 11:24 PM