AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahjibapu Patil | Shinde Fadnavis सरकार एकत्रितपणे विधानसभा, लोकसभेला समोर जाईल

Shahjibapu Patil | Shinde Fadnavis सरकार एकत्रितपणे विधानसभा, लोकसभेला समोर जाईल

| Updated on: Jan 02, 2023 | 9:07 PM
Share

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चंद्रपुरामध्ये 144 ची घोषणा केल्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकार हे एकत्रित विधानसभा, लोकसभेला लढवणार असल्याचे म्हटलं आहे

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चंद्रपुरामध्ये पार पडलेल्या सभेत मिशन 144 ची घोषणा केली. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखिल नड्डा यांनी तसेच आदेश दिल्याचेच सांगितले. त्यामुळे शिंदे गटाच्या मतदार संघात देखिल भाजप निवडणक लढवणार असेच चित्र समोर येत आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे नेते आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

आमदार शहाजीबापू पाटील यांनी येणाऱ्या 2024 च्या लोकसभा या शिंदे-फडणवीस सरकार हे एकत्रित लढवणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देतानाही ते म्हणाले, 45 आम्ही वाटून घेऊ. पण उरलेले 3 मध्ये तुम्ही आणि शरद पवार कसे वाटणी करणार हे आधी सांगा. ते फोनवर कळवा असेही शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.

तर जेपी नड्डा यांनी चंद्रपुरामध्ये दिलेल्या घोषणेनंतर खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचले होते, तसेच जर भाजप 144 आमदार निवडणून आणण्याची रणनीती आखत असेल तर शिंदे गट काय करणार असा सवाल खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला केला.

Published on: Jan 02, 2023 09:07 PM