शहाजीबापूंचा आरोग्याचा मंत्र, बापूंनी 8 दिवसांत 9 किलो वजन घटवलं, कसं ते त्यांनी सांगितलं

श्वासाच्या क्रिया झाल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो. त्यानंतर वीस मिनिटं शांत झोपायला लावतात.

शहाजीबापूंचा आरोग्याचा मंत्र, बापूंनी 8 दिवसांत 9 किलो वजन घटवलं, कसं ते त्यांनी सांगितलं
शहाजीबापू पाटील
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 6:02 PM

सोलापूर : शिंदे गटाचे फायरब्रँड नेते शहाजीबापू पाटील यांनी 8 दिवसांत 9 किलो वजन घटवलं. त्यामुळं ते पुन्हा चर्चेत आलेत. याबाबत बोलताना शहाजीबापू म्हणाले, श्री रविशंकर यांच्या आश्रमात सुदर्शन क्रिया आणि पंचकर्म करण्यासाठी गेलो होतो. पाच दिवस त्यांनी पंचकर्माच्या क्रिया केल्या. पोट साफ करण्यासाठी प्रक्रिया केली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तेल अंगावर लावले. तसेच पावडर लाऊन शरीराला हलकं करून दिलं. पंचकर्म क्रिया पूर्ण झाल्यानंतर शिरोधारा केली. शिरोधारामुळं मन हलकं होतं. त्यानंतर तीन दिवस मेडिटेशन आणि सुदर्शन क्रिया केली. त्यांनी माझ्याकडून व्यायाम करून घेतला. प्राणायम करायला लावतात. सहा वेळा श्वास पोटात घ्यावा लागतो. छातीत आठ वेळा श्वास घ्यायला सांगतात. अशा काही श्वासाच्या क्रिया करून घेतात.

श्वासाच्या क्रिया झाल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो. त्यानंतर वीस मिनिटं शांत झोपायला लावतात. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सर्व अवयवांवर लक्ष केंद्रीत करायला लावतात, असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.

डाव्या बाजूला लक्ष केंद्रीत करायला लावतात. ही क्रिया पूर्ण झाल्यानंतर ध्यान कसं करायचं याचं मार्गदर्शन करतात. वीस मिनिटांचं ध्यान करून घेतात. शरीर व मन शांत होतं. वजन कमी होतं. मानसिक तणाव आणि चिंता कमी होते, अशी माहिती शहाजीबापू पाटील यांनी दिली.

शहाजीबापू आधी काय झाडी काय डोंगर, या डायलॉगसाठी फेमस होते. आता ते वजन कसं कमी करायचं, यासाठी फेमस झाले. आठ दिवसांत वजन कमी करून त्यांनी आरोग्याचा आदर्श घालून दिला.

Non Stop LIVE Update
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.