AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahaji Bapu Patil : आजारपण कॅन्सरपर्यंत... फडणवीसजी काय चुकलं? शहाजीबापू एकटे अन् भाजपवर संतापले

Shahaji Bapu Patil : आजारपण कॅन्सरपर्यंत… फडणवीसजी काय चुकलं? शहाजीबापू एकटे अन् भाजपवर संतापले

| Updated on: Nov 21, 2025 | 9:01 AM
Share

सांगोला नगरपालिकेत शहाजी बापू पाटील यांना भाजपसह सर्व पक्षांनी घेरले आहे. यावर शहाजी बापूंनी थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आपली खंत व्यक्त केली. भाजपवर संताप व्यक्त करत, त्यांनी आघाडी न झाल्याबद्दल भाजपला जबाबदार धरले. सांगोला निवडणुकीतील बदललेल्या राजकीय समीकरणांवर हा संघर्ष आधारित आहे.

सांगोला नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येथे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील हे भाजपसह इतर सर्व पक्षांविरोधात एकटे पडल्याचे चित्र आहे. या परिस्थितीमुळे संतापलेल्या शहाजी बापूंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, “मी तुमचा कोणता शब्द मोडला?” असा सवाल विचारला आहे. लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याची आठवण करून देत, आता आजारपणाने कॅन्सरकडे वळल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपच्या या भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीस यांनी याचा विचार करायला हवा होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे, भाजप नेते जयकुमार गोरे यांनी शहाजी बापूंनी नगराध्यक्षपदासाठी आनंदा माने यांची उमेदवारी आधीच जाहीर केल्याने युती होऊ शकली नाही, असा प्रतिसवाल केला. सांगोल्यात भाजप, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यासह इतर पक्ष एकत्र आले असून, शहाजी बापू पाटील एकटे पडले आहेत.

Published on: Nov 21, 2025 09:01 AM