Shahid Afridi : शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात… म्हणतो पाकिस्तानचाच विजय, रॅली काढत लष्कराचा खोटा प्रचार अन्…
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला लष्करी तणाव शनिवारी संपुष्टात आला. दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये झालेल्या चर्चेनंतर, ते तात्काळ थांबवण्यावर एकमत झाले. अशातच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने एक रॅली आयोजित केल्याचे पाहायला मिळाले.
भारत आणि पाकिस्तानमधील सध्या लष्करी तणाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही देशांमधील एकमतानंतर ७ मे च्या रात्रीपासून पाकिस्तानकडून केले जाणारे ड्रोन हल्ले थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागातील बैसरन खोऱ्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केल्यावर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. या क्रूर हत्येनंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. दरम्यान, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने पूर्वीप्रमाणेच दहशतवादाला पोसणाऱ्या आपल्या देशाचे रक्षण केले. त्याने या हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरले होते.
इतकंच नाहीतर शाहिद आफ्रिदीचा निर्लज्जपणा इतका होता की, त्याने युद्धबंदीनंतर पाकिस्तानचा विजय घोषित केला. पाकिस्तानी लष्कराला पाठिंबा देण्यासाठी शाहिद आफ्रिदीने रविवारी कराचीत एक सार्वजनिक रॅली काढली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहिद गाड्यांच्या ताफ्यासोबत दिसत आहे. यादरम्यान, तो वाटेत लोकांना अभिवादन देखील करत भारताविरोधात पाकचा विजय झाला असे म्हणत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देताना दिसतोय.
Shahid Afridi leads a rally in Karachi to celebrate Pakistan's victory. 🇵🇰
Boom Boom in support of Pakistan Army.
#PakvsIndiaWar #IndiaPakistanWar2025 #PakistanZinadabad @SAfridiOfficial pic.twitter.com/KKs2flJdPe— Maham Gillani (@DheetAfridian) May 11, 2025