India-Pakistan Conflict : पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय….
युद्धबंदी असूनही पाकिस्तानने अनेक ठिकाणी त्याचे उल्लंघन केले, ज्यामुळे शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांच्यातील तणाव स्पष्टपणे दिसून आला आहे. असे असूनही, शरीफ यांनी भारताविरुद्ध विष ओकल्याचे पाहायला मिळाले.
पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. युद्धविरामासाठी पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारची विनंती करण्यात आली नाही, असे पाकिस्तानच्या आर्मीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, आतंरराष्ट्रीय हालचालीनंतर आम्ही प्रतिसाद दिल्याचा पाकिस्तानकडून कांगावा करण्यात येत आहे. तर युद्धबंदीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले होते. मात्र पुन्हा एकदा पाकचा खोटारडेपणा समोर आला आहे.
पाकिस्तानने युद्धबंदीचे आवाहन केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये पुढे कोणताही हल्ला न करण्याचा करार झाला होता. त्यानंतरही, पाकिस्तान आपल्या डावपेचांपासून मागे हटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. युद्धबंदी लागू होताच पाकिस्तानने आपला शब्द न पाळत अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. यावरून असे दिसून येते की पाकिस्तानचे शाहबाज शरीफ सरकार आणि असीम मुनीर यांच्या सैन्यात काहीच अलबेल नाही. दरम्यान, राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, शाहबाज शरीफ यांनी पुन्हा आपल्या भाषणात भारताविरुद्ध विष ओकल्याचे पाहायला मिळाले.