India vs Pakistan Conflict : मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा? भारताची भूमिका काय?
भारत पाकिस्तानच्या DGMO यांच्यात होणाऱ्या आजच्या महत्त्वाची चर्चेपूर्वी मोदींच्या निवासस्थानी एक बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसह सीडीएस देखील बैठकीसाठी उपस्थित होते.
भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानचे डीजीओमओ यांची दुपारी चर्चा होणार होती. मात्र या चर्चेची वेळ आता पुढे ढकलण्यात आली असून ही चर्चा आता संध्याकाळी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हॉटलाईनवरून भारत आणि पाकिस्तान या देशांचे DGMO एकमेकांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, भारत सरकारची भूमिका नेमकी काय असणार याची माहिती समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू करार स्थगितच राहणार आहे. पाकसोबत व्यापरही स्थगित राहणार असून यासंदर्भात कोणतीही चर्चा या चर्चेदरम्यान होणार नाही. पीओके, दहशतवादाच्या मुद्द्याशिवाय पाकसोबत इतर कोणतीही चर्चा होणार नाहीये. तर भारत आणि पाकिस्तान या देशांचे DGMO यांच्या चर्चेदरम्यान शाहबाज शरीफ याला नेमकी कोणती आशा आहे? बघा व्हिडीओ
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

