किंग खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित, नाशकात थिएटरबाहेर पोलीस बंदोबस्त

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Jan 25, 2023 | 9:23 AM

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा पठाण चित्रपट प्रदर्शित झालाय. नाशिकमध्ये थिएटर बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पाहा...

नाशिक :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा पठाण चित्रपट प्रदर्शित झालाय. नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी चित्रपटाचे शो हाउसफुल्ल झाल्याचं पाहायला मिळातंय. चित्रपट पाहण्यासाठी सिनेरसिक मालेगाववरून नाशिकला आलेत. मात्र नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलने या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे थिएटर बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिकच्या कॉलेजरोडवरील सिनेमॅक्स थिएटरबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI