MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 3 October 2021

| Updated on: Oct 03, 2021 | 7:04 PM

अटक करण्यात आलेला आर्यन खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि इंटिरिअर डिझायनर-चित्रपट निर्माती गौरी खान यांचा सर्वात मोठा मुलगा. तो 23 वर्षांचा आहे.

Follow us on

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या मुलाला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) ताब्यात घेतलं आहे. मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी चौकशी सुरु असलेल्यांची नावं जाहीर केली असून आर्यन खानच्या नावाला दुजोरा दिला. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. अरबाझ मर्चंट हा शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा जवळचा मित्र आहे.