Shanivarwada Namaz Controversy: आता हे काय! शनिवारवाड्यातच नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल; नमाज पठणाच्या जागेवर गोमूत्र अन्…
पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. खासदार मेधा कुलकर्णींच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी गोमूत्र शिंपडून भगवा ध्वज फडकवला आणि अनधिकृत मजार हटवण्याची मागणी केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने मेधा कुलकर्णींवर समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी शनिवार वाड्यासमोर आंदोलन केले. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ शेअर करत, पतित पावन संघटना आणि सकल हिंदू समाजासोबत आंदोलनात भाग घेतला. आंदोलकांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडले आणि भगवा ध्वज फडकावला. तसेच, परिसरात असलेल्या मजारला अनधिकृत ठरवून ती हटवण्याची मागणी केली.
अशा घटनांमुळे कालांतराने जागांवर दावा केला जातो, अशी आंदोलकांची भूमिका होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार मेधा कुलकर्णींच्या या आंदोलनावर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मेधा कुलकर्णींवर समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पुणे शहरात नुकत्याच घडलेल्या मॉडर्न कॉलेज वादाच्या पार्श्वभूमीवर हा नवीन मुद्दा समोर आला आहे.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

