Big Breaking : जेव्हा अविमुक्तेश्वरानंद महाराज मराठीचे धडे गिरवतात..
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज मराठी भाषा शिकून मराठी भाषेचा आदर करण्याचा संदेश देत आहेत.
गोविंद ठाकूर, प्रतिनिधी
मराठी भाषा शिकून मराठी भाषेचा आदर करण्याचा संदेश शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज देत आहेत. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी आज टीव्ही 9 शी मराठीत संवाद साधला. शंकराचार्यांनी टीव्ही 9 च्या कॅमेऱ्यासमोर एक मराठी पुस्तक वाचले. शंकराचार्य म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आम्हाला मराठी शिकवायला आले नाहीत किंवा त्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्नही केला नाही. परंतु आमदार प्रकाश सुर्वे यांनी आम्हाला दोन शिक्षक दिले आणि आम्ही मराठी शिकू लागलो. मी कोणाच्या भीतीने किंवा घाबरून मराठी शिकत नाहीये. मी स्वतःसाठी मराठी शिकत आहे. मी एक नवीन भाषा शिकत आहे. शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आणि मराठीला विरोध करणाऱ्यांनाही मराठीत संदेश दिला. मुंबईत सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाच्या पार्श्वभूमीवर, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराजांनी आजपासून मराठी भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे. आजपासून तीन मराठी शिक्षक शंकराचार्यांना मराठी शिकवत आहेत. शिवाजी शेंडगे नावाच्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शंकराचार्य यांना मराठी भाषा शिकवली जात आहे. मराठी भाषा बोलण्यास आणि शिकण्यास नकार देणाऱ्यांसाठी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराजांचा एक मोठा संदेश आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

