Special Report | राष्ट्रपती राजवटीची चर्चा…किस्से..टोले-प्रतिटोले-tv9
विरोधकांची आंदोलनं आणि त्यावरुन होणाऱ्या हल्ल्यांवरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची चर्चा होतेय. भाजपचे काही नेते महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था बिघडल्यामुळे राष्ट्रपती राजवटीची मागणी करतायत आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी सुद्धा राष्ट्रपती राजवट लावून दाखवाच, म्हणून भाजपला आव्हान देतायत.
विरोधकांची आंदोलनं आणि त्यावरुन होणाऱ्या हल्ल्यांवरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा
राष्ट्रपती राजवटीची चर्चा होतेय. भाजपचे काही नेते महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था बिघडल्यामुळे राष्ट्रपती राजवटीची मागणी करतायत आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी सुद्धा राष्ट्रपती राजवट लावून दाखवाच, म्हणून भाजपला आव्हान देतायत. दुसरीकडे शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट आणि सत्तेवरुन एक किस्सा ऐकवला ज्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांना टोला मारला. गेल्या अडीच वर्षांपासून दर ५ महिन्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची चर्चा होते. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस वगळता भाजपच्या बहुतांश नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केलीय.मात्र तूर्तास या चर्चा फक्त चर्चाच राहिल्यायत.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

