Video | शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात बैठक, महत्त्वाच्या तीन विषयांवर चर्चा झाल्याचा अंदाज

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली आहे. सध्याच्या राज्यात घडत असलेल्या घडामोडींमध्ये ही पवार-ठाकरे भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. सध्याच्या राज्यात घडत असलेल्या घडामोडींमध्ये पवार-ठाकरे भेट महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर संसदेत काय भूमिका मांडावी, या विषयावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत सहकार कायदे आणि संसदीय अधिवेशनावरदेखील चर्चा झाल्याचा अंदाज आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI