Video | शरद पवार-मुख्यमंत्र्यांची वर्षावर महत्वाची बैठक, अर्ध्या तासापासून खलबतं

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक सुरु आहे.

मुंबई :  राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक सुरु आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांना भेटत आहेत. त्यानंतर आजा पवार-ठाकरे यांच्यात प्रत्यक्ष बैठक सुरु आहे.

बैठकीत काय कोणत्या विषयांवर चर्चा ?

1) महामंडळ वाटप विषय तत्काळ मार्गी लागावा.

2) कोव्हिड निर्बंधाबाबत अन्य राज्यांना आपण फॉलो केलं पाहिजे. सततच्या निर्बंधामुळे सर्वसामान्य जनतेत आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. राज्याची आर्थिक घडीही विस्कटते आहे.

3) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आता फार चालढकल करू नये. आपण ही निवडणूक जिंकू, चिंता नको.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI