VIDEO | ‘राज्याचा पुर्वीचा इतिहास कुणाला माहित नसेल तर…’; पवार यांनी वळसे पाटील यांना थेट आरसाच दाखवला
काही दिवसांपुर्वी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठा दावा केला होता. तसेच शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही असं म्हटलं होतं.
पुणे : 26 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यामुळे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासून मानले जाणारे अनेक नेते हे अजित पवार यांच्याबरोबर गेले. त्यानंतर आता राष्ट्रवादीवरून अजित पवार गट आणि शरद पवार गटात कलगितूरा लागल्याचे पाहायला मिळत आहे. तर मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एका कार्यक्रमात पवार यांच्या टीका करताना, त्यांना राज्यात एकदाही बहुमताचे सरकार किंवा मुख्यमंत्री करता आलेलं नाही, अशी टीका केली होती. त्यावरून वळसे पाटील यांच्यावर अनेकांनी जोरदार पलटवार केला होता. त्यानंतर आता शरद पवार यांनीच हा दावा खोडून काढला आहे.
पवार यांनी पुण्यात वळसे पाटील यांच्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना, जोरदार टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी, मी स्वबळावर निवडणूक आलो होतो. हा इतिहास कोणाला माहित नसेल तर मी काय करू असा सवाल वळसे पाटील यांना केला आहे. तर मी ३ वेळा मुख्यमंत्री झालो.
पहिल्यांदा पुलोद स्थापन करून मी मुख्यमंत्री झालो. दुसऱ्यांदा काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री झालो. त्यावेळी माझ्याच नेतृत्वात ती निवडणूक झाली. आम्ही बहुमताने ती जिंकली आणि मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे राज्याचा पुर्वीचा इतिहास कुणाला माहित नसेल तर त्याच्यावर काय भाष्य करायचं असा टोला त्यांनी वळसे पाटील यांना लगावला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

