Sandeep Kshirsagar Video : ‘वाल्मिक कराड माझा माणूस…’, संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
निकटवर्तीय असल्याने असे गुन्हे करण्याची संधी देता का? असा संतप्त सवाल करत संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर वाल्मिक कराडवर आधीच कारवाई का झाली नाही? असाही थेट सवाल संदीप क्षीरसागर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
वाल्मिक कराड हा माझा माणूस आहे, हे मंत्री धनंजय मुंडे यांनी आधीच सांगितलं होतं, असं वक्तव्य शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं. तर निकटवर्तीय असल्याने असे गुन्हे करण्याची संधी देता का? असा संतप्त सवाल करत संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर वाल्मिक कराडवर आधीच कारवाई का झाली नाही? असाही थेट सवाल संदीप क्षीरसागर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. दरम्यान, काल झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून कोणाला सोडणार नाही आणि त्यांचा राजीनामा घेणार असं म्हटलंय. दरम्यान, नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांचा विरोधक राजीनामा मागताय. यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘मस्साजोगच्या ग्रामस्थांसह संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेली माहिती मागच्या सभागृहात सादर केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास झाला. समोर आलेल्या चार्टशीटमधून वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. कराड हा काही मोठा माणूस नाही. गंभीर गुन्हा झाल्यानंतर नोंद होण्यास उशीर होतो. स्वतः मुंडेंच म्हणाले होते कराड हा माझा निकटवर्तीय आहे. म्हणून असं करण्यास त्यांना तुम्ही देतात का? पोलीस प्रशासन का शांत होतं?’, असं म्हणत काही सवाल क्षीरसागर यांनी उपस्थित केलेत.