VIDEO : शरद पवार यांना कोरोना लस, पाहा व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी कोरोनाची लस टोचून घेतली. (Sharad Pawar take Covid 19 Vaccine in Mumbai)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:19 PM, 1 Mar 2021

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (1 मार्च) सोमवारी कोरोनाची लस (Covid 19 Vaccine) टोचून घेतली. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात शरद पवारांनी कोव्हिशिल्डची कोरोना लस घेतली. काही वेळापूर्वी ते मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी पवारांसोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात दाखल झाल्या. याशिवाय, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती. (Sharad Pawar take Covid 19 Vaccine in Mumbai)

शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जाते आहे.