Chala Hawa Yeu Dya : गर्विष्ठ माणूस, डोक्यात हवा… निलेश साबळेंबद्दल राशीचक्रकार उपाध्ये काय म्हणाले? दुसऱ्या पर्वात नवा सूत्रसंचालक कोण?
'एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. अभिजित खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामांनी दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो हीच विनंती'
चला हवा येऊ द्या, हा विनोदी कार्यक्रम चांगलाच गाजला होता. मात्र आता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वामध्ये निलेश साबळे नसणार आहेत. त्यांच्या जागी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आता अभिनेता अभिजित खांडकेकर करतील. मात्र या बातमीवरून राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळे यांच्यावर पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली आहे. गरिब माणसाचं अध:पतन होतं असंही शरद उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय. चला हवा येऊद्याच्या कार्यक्रमामध्ये उपाध्येनी स्वतःला आलेला अनुभव सोशल मीडिया मध्ये लिहिला आहे. यावर अद्याप निलेश साबळे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
अशी आहे पोस्ट
आदरणीय निलेशजी साबळे, आपल्याला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या पर्वातून डच्चू मिळून त्या जागी अभिजित खांडकेकर यांना आणल्याची बातमी पेपरमध्ये वाचली. वाईट वाटलं पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा कार्यक्रमात बोलावलं होतं, मी अकराला पोहोचलो पण तीनपर्यंत त्या रूममध्ये कोणीच फिरकलं नाही. निलेश, तुम्ही इतर कलावंतांच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारीत होतात. पण माझ्या रूममध्ये डोकावलात ते थेट चार वाजता स्माईलही न देता स्टेजवर गेलात. मित्रांचे शूटिंग खूप वेळ केलं पण मला सहा वाजता बोलावून घाईघाईत पंधरा मिनिटात आटोपलं. एडिटिंगमध्ये ही माझी उत्तरं गाळली. बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडी’लांच्या नाते काही सल्ले दिले. पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुसऱ्यांबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की गर माणसाचं गर्विष्ठ अध:पतन होतं.

भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?

आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या अन्..

राड्यानंतर मविआचे नेते राज्यपालांच्या भेटीला

त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या
