Raigad : 50 खोकेचं विधान झोबलं अन्… सत्ताधारी आमदारांनंतर आता त्यांच्या पत्नीची दादागिरी, VIDEO तर बघा…
खराब रस्त्यांचा प्रश्न मांडताना आमदार पत्नीनं शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना धक्काबुक्की केली. 50 खोके या घोषणेवरून हा वाद सुरू झाला. नेमकं काय घडलं?
राज्यातल्या काही सत्ताधारी आमदारांनंतर आता त्यांच्या पत्नी सुद्धा मारण्यासाठी अंगावर धावू लागल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ज्या बोलतायेत त्या शेकापच्या जयंत पाटील यांच्या सून चित्रलेखा पाटील आणि त्यांच्या पाठीमागे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी उभ्या आहेत.
रायगडमधल्या साळाव तळेखा रस्त्याने त्रस्त लोक नेत्यांकडे गाऱ्हाणं मांडत होते. हा रस्ता जर वरून पाहिला तर तुम्हाला चंद्राच्या पृष्ठभागा सारखा वाटेल. इथे अंतराळवीर चालवला तर असता आहे की चंद्र हा फरक करणार सुद्धा अवघड होईल. पृथ्वीतलावरच चंद्रावर चालण्याचा आनंद यंत्रणेनं रायगडवासीयांना उपलब्ध करून दिलाय.धक्कादायक बाब म्हणजे जमिनीवरच हे तंत्रज्ञान विकसित असताना सुद्धा इस्रोसारख्या संस्था चंद्राच्या स्वारीसाठी करोडो रुपये नाहीक खर्च करतायेत. इतकी वाईट अवस्था साळाव तळेखार या रोडची झाली आहे.
सहा महिन्यापासून हा रोड याच स्थितीमध्ये आहे. त्यावर मूळ मुद्यांवर राज्य सरकारचं लक्ष आहे की नाही? की फक्त 50 खोके ओकेचं घाणारेडं राजकारण चालणार असा प्रश्न शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी केला. मात्र 50 खोके बोलताच शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नींना ते झोंबलं आणि त्यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी चित्रलेखा पाटील यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

