शिवाजी पार्कात दिग्दर्शकाचं थेट झाडावर चढून अनोखं आंदोलन; मागणी नेमकी काय?
चित्रपटात प्राण्यांबद्दल काही सीन्स असले तर त्यासाठी ॲनिमल वेलफेअर बोर्डाकडून NOC लागते. मात्र या NOC साठी नेहमी निर्माते-दिग्दर्शकांकडून 30 हजार रुपये लुबाडले जातात, असा आरोप या दिग्दर्शकाकडून करण्यात येत आहे. अग्निशमन दलाने झाडावर चढून या दिग्दर्शकाला खाली उतरवण्याचं प्रयत्न करत आहेत.
मुंबईच्या शिवाजीपार्क परिसरात एक अनोखं आंदोलन सुरू असल्याचे पाहायला मिळाले. मराठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेत्याने मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असणाऱ्या झाडावर चढून आगळं वेगळं आंदोलन केलं. या चित्रपट दिग्दर्शकाचं प्रविण कुमार मोहारे असं आहे. नाव ॲनिमल वेलफेअर बोर्डाने NOC च्या नावाखाली पैसे घेऊ नये अशी या दिग्दर्शकाची मागणी आहे. यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यास अडथळा येत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. NOC च्या नावाखाली 30-30 हजार रुपयांची मागणी करू नये, असे त्याने म्हटले आहे. दरम्यान, या दिग्दर्शकाला झाडावरून खाली आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आपले शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र आपली मागणी मांडल्याशिवाय खाली येणार नसल्याचे तो झाडावरील आंदोलनावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?

