Shirdi Saibaba Trust | शिर्डीच्या विश्वस्त मंडळाची घोषणा लांबणीवर

राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. दोन आठवड्यात विश्वस्त मंडळ जाहीर करु, असं राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठात म्हटलंय. त्यानुसार आता औरंगाबाद खंडपीठाने मुदत वाढवून दिली आहे.

शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळाची घोषणा पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. दोन आठवड्यात विश्वस्त मंडळ जाहीर करु, असं राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठात म्हटलंय. त्यानुसार आता औरंगाबाद खंडपीठाने मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्य कोण होणार याची उत्कंठा लागून राहिली आहे. दरम्यान, शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळ वाटपावरुन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI