Uddhav Thackeray : ‘…तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा’, नाशिकच्या निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मोठी मागणी
'फडणवीस यांनी म्हटलं शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून द्यावसं वाटतं. तेव्हा त्यांना कुणी तरी सांगितलं की, अहो अमित शाहच शिवाजी महाराजांना एकेरी बोलले. तेव्हा फडणवीस थांबले आणि म्हणाले, आपण लोकशाहीत राहतोय'
शिवसेना ठाकरे गटाकडून आज नाशिकमध्ये निर्धार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या निर्धार शिबिरातून ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी एक मोठी मागणी केल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरेंनी शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरेंनी या नाशिकमधील निर्धार मेळाव्यातून केली. शिवाजी महाराजांचे नाव कुणी घ्यायचे. संभाजी महाराजांचे नाव कोणी घ्यायचे. अमित शाह रायगडावर आले, त्यांनी सांगितलं महाराजांना महाराष्ट्रापुरतं सीमित करू नका. शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ही शिवशाही आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाजी महाराज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. तुम्हाला खरोखर आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. फक्त मतांसाठी शिवाजी महाराज की जय म्हणू नका, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल करत ही मोठी मागणी केली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

