AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant Car Attack | पुण्यात उदय सामांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, गाडीची मागची काच फुटली, सामंत सुखरुप

Uday Samant Car Attack | पुण्यात उदय सामांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, गाडीची मागची काच फुटली, सामंत सुखरुप

| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 11:51 PM
Share

मंगळवारी पुण्यात शिवसैनिकांनी एक धक्कादायक प्रकार केलाय. एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात उदय सामंतांची गाडी  शिवसैनिकांनी फोडली आहे.

एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील संघर्ष आता शिगेला पोहोयलाय. एकमेकांवर टीका करणारे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आता हाणामारीवर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी पुण्यात शिवसैनिकांनी एक धक्कादायक प्रकार केलाय. एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात उदय सामंतांची गाडी  शिवसैनिकांनी फोडली आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराकडे जाताना हा प्रकार घडलेला आहे. सभा संपल्यानंतर कात्रज चौकात अवघ्या काही मिनिटात शिवसैनिकांनी हा हल्ला चढवलेला आहे. तर यावेळी गद्दारी केली म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रकरणा आता जोरादार तापण्याची शक्यता आहे. तर दुसरीकेड कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान हे आता पोलिसांसमोर असणार आहे.

Published on: Aug 02, 2022 11:51 PM