‘50 खोके… एकदम ओके’ वादात उडी; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
मातोश्रीवर शिवसैनिकांनी आपल्यासोबत प्रतिज्ञापत्रांच्या सहा पेट्या आणल्या होत्या. त्या त्यांनी ठाकरेंना दिल्या. शिवसैनिकांना संबोधित करताना पाच खोके नॉट ओके असं ते म्हणाले. पुढील वेळी येताना 5 चे 15., 15 चे 20 खोके निष्ठेचे घेऊन या. अन्यथा माध्यमवाले येथेही खोके येतात असे म्हणतील असा टोला हाणतानाच हे खोके शिवसैनिकांच्या निष्ठेचे आहेत, असे ठाकरे म्हणाले.
मुंबई : विधिमंडळ अधिवेशनावेळी शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाने ‘50 खोके, एकदम ओके’च्या घोषणा दिल्या होत्या. या वादात आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनीही(Shiv Sena chief Uddhav Thackeray) उडी घेतली आहे. मातोश्रीवर शिवसैनिकांनी आपल्यासोबत प्रतिज्ञापत्रांच्या सहा पेट्या आणल्या होत्या. त्या त्यांनी ठाकरेंना दिल्या. शिवसैनिकांना संबोधित करताना पाच खोके नॉट ओके असं ते म्हणाले. पुढील वेळी येताना 5 चे 15., 15 चे 20 खोके निष्ठेचे घेऊन या. अन्यथा माध्यमवाले येथेही खोके येतात असे म्हणतील असा टोला हाणतानाच हे खोके शिवसैनिकांच्या निष्ठेचे आहेत, असे ठाकरे म्हणाले. बंडखोरांकडे सर्वच पैशांनी होते. त्यांच्याकडे पैशांचीच किंमत आहे. मात्र, माझ्याकडे रक्तामासांची माणसे आहेत. शिवसैनिक माझ्यासोबत असेपर्यंत मला कोणतीही चिंता नाही. निवडणुकीत सर्व चित्र स्पष्ट होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणुकीला सामोरे जाण्याची गद्दारांची हिंमत नसल्याने राज्यात लवकर निवडणुका होतील असे वाटतही नसल्याचा टोला त्यांनी बंडखोरांना उद्देशून हाणला.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर

