'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे

‘शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,’ काय म्हणाले अंबादास दानवे

| Updated on: Dec 05, 2024 | 4:09 PM

राज्यातील विधानसभा निवडणूका जिंकल्यानंतर आता भाजपा महायुतीचे सरकारच्या तीन प्रमुख पदाचा ग्रॅंड शपथविधी सोहळा होत आहे. या सोहळ्याला उद्धव ठाकरे जाणार नाहीत असे उबाटा शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्राचे शेतकरी इतक्या हलाखीत असताना केवळ तिघांसाठी इतका मोठा शपथ सोहळा घेण्याची काही आवश्यकता नव्हती. राजभवानावर देखील चांगला सोहळा झाला असता असे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीचे तळ्यात मळ्यात चालले आहे. याबद्दल विचारता दरवेळी कोणी बलिदान करणार नाही. आता भाजपाला इतक्या जागा मिळाल्यावर ते आपला मुख्यमंत्री करणारच असेही अंबादास दानवे यांनी सांगितले. त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार आहे. न घेऊन सांगणार कोणाला. भाजपावाले दिल्लीत सांगतात ते ऐकावे लागणार आहे.एकप्रकारे कानशि‍लावर बंदूक ठेवून शपथ घ्यावी लावतील असे नेते भाजपात आता आहे. हा पूर्वीचा भाजपा नाही की ते मनधरणी करत बसतील असेही अंबादास म्हणाले. आम्ही शपथविधीवर बहिष्कार टाकणार नाही हा शब्द बरोबर नाही. परंतू आम्ही जाणार देखील नाही. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. शिवसेना एक लोकप्रतिनिधी असताना संघर्ष करीत होती. आता २० आमदार आणि राज्यसभेचे धरुन १२ खासदार आहेत. आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी आमचा लढा सुरुच ठेवू असेही दानवे यांनी सांगितले.

Published on: Dec 05, 2024 04:08 PM